बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) म्हणजे अवघ्या मनोरंजन विश्वाचा किंग खान. आज किंग खानचा ५७ वा वाढदिवस आहे. शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे वाढदिवसाला सुरुवात होताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. मुंबईत तर त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची अक्षरशः जत्रा भरली आहे